Friday 22 September 2017

देवरी तालुक्यातील ग्रामीण राजकारण पेटले


तालुका प्रशासन देखील सज्ज

आजपासून नामांकनाला सुरवात

सुरेश भदाडे


Image result for gram panchayat logoदेवरी,२२- 'गावचा सरपंच हा थेट जनतेतून ' या राज्यसरकारच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील राजकारणाने चांगलाच पेट घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याची देवरी सारख्या शांत तालुक्याली सुद्धा लागण झाली असून गावागावात 'सरपंच मीच होणार' या भावनेचा चांगलाच उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे आवाहन पेलण्यासाठी तालुका प्रशासनाने सुद्धा कंबर कसली असल्याची माहिती तहसीलदार विजय बोरूडे यांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
राज्य सरकारने यावर्षी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये सुधारणा करून आमुलाग्र बदल घडवून आणला. आता सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य नाही, तर जनतेद्वारा थेट मतदानातून निवड करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. हे बदल करताना गावसरंपचाच्या अधिकार कक्षा रुंदावताच त्यांच्या अधिकारातही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण राजकारणातील लुडबुड कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने सरपंचावरील अविश्वास दर्शक ठराव पारित करण्याची पारंपारिक पद्दत सुद्धा उखडून फेकली आहे. परिणामी, गावात 'मीच सरपंच होणार' या भावनेने गावनेते चांगलेच कामाला लागले आहेत. यामुळे आतापर्यंत पॅनलमध्ये निवडणुक लढवून नंतर सरपंच पदाची फिल्डींग लावणारी मंडळी आता पॅनल ऐवजी सरपंचाच्या खूर्चीसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षाचे नेते सुद्धा पडद्याआड चाली खेळून या निवडणुकीत रंग भरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
देवरी तालुक्यातील नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणाèया २५ ग्रामपंचायतींसाठी येत्या १६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून आज २२ सप्टेंबर पासून नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. एकूण ७५ प्रभागासाठी होणाèया निवडणुकीतून २०९ सदस्यांची निवड होणार असून यात ११७ महिला सदस्यांचा समावेश आहे. आरक्षणाचा विचार केला तर अनुसूचित जातीतील २३ पैकी १९, अनुसूचित जमातीतील १२० पैकी ६४, नागरिकांच्या मागास प्रवर्गातून ४१ पैकी २१ तर सर्वसाधारण गटातून २५ पैकी १३ महिला सदस्यांची निवड करावयाची आहे.
तालुक्यातील सरपंच पदाचा आकडेवारी पाहिल्यास अनुसूचित जाती प्रवर्गातून ४ पैकी २, अनुसूचित जमाती प्रवर्गातून १३ पैकी ९, नामाप्रतून ६ पैकी २ तर सर्वसाधारण गटातून २ पैकी १ असे १४ गावाच्या प्रमुखपदी महिला सरपंच विराजमान होणार आहेत. देवरी तालुक्यातील ४१ हजार १४८ लोकसंख्येच्या २५ गावातील २९ हजार २९७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. यामध्ये १४ हजार ८७३ पुरूष तर १४ हजार २९७ महिला मतदारांचा समावेश आहे.
तहसीलदार विजय बोरूडे यांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणुक सुरळीत पूर्ण करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याचे सांगत एकूण ५ निवडणूक निर्णय अधिकारी व ५ सहायत निवडणूक निर्णय अधिकाèयांची नेमणूक केल्याची माहिती दिली. निवडणुक प्रक्रिया शांततेत पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा श्री. बोरुडे यांनी बोलताना केले. सदर निवडणुक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...